एमआयटी-एडीटी विद्यापीठ आणि सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

MoU between MIT-ADT University and COEP Technological University

पुणे, १५ ऑक्टोबर २०२५ | Pune, 15th October 2025

एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे आणि सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, पुणे यांच्यात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

MIT-ADT University, Pune and COEP Technological University, Pune have entered into a Memorandum of Understanding (MoU) to strengthen collaboration in academic and research domains.

एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे 'कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्याशी करार केला. या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रकल्प, इंटर्नशिप तसेच भविष्यातील नवीन प्रोजेक्ट वरती काम करण्याची संधी मिळेल. या करारामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्था यांच्यातील दुवा अधिक बळकट होणार आहे.

This partnership will provide students opportunities to work on industrial projects, internships, and future innovative projects, strengthening the bond between students, faculty, and institutions.

MoU Signing Ceremony

COEP MoU Signing Ceremony

Click to view full image

Distinguished Attendees | उपस्थित मान्यवर

MIT-ADT University
  • प्रा. डॉ. मंगेश कराड - माननीय कार्याध्यक्ष
  • प्रा. डॉ. सुनिता कराड - माननीय संचालिका
  • प्रा. डॉ. राजेश एस. - माननीय कुलगुरू
  • प्रा. डॉ. विरेंद्र शेटे - अधिष्ठाता (NEP, Ranking & Accreditation)
  • प्रा. डॉ. महेश चोपडे - कुलसचिव
  • प्रा. डॉ. ज्ञानदेव नीलगुंड - परीक्षा नियंत्रक
COEP Technological University
  • प्रा. डॉ. एस. वी. विरूड - माननीय कुलगुरू
  • प्रा. डॉ. डी. एन. सोनगावे - माननीय कुलसचिव
  • प्रा. डॉ. विजया व्यास - विभागप्रमुख (Electronics & Communication)

Objectives of the MoU | कराराचे उद्देश

या कराराचा उद्देश शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच ज्ञान विनिमयाच्या माध्यमातून दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमधील सहकार्य वृद्धिंगत करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, मल्टी डिसिप्लिनरी स्टुडन्ट एक्सचेंज रिसोर्स शेअरिंग जॉईन प्रोजेक्ट हा आहे.

The objective of this agreement is to strengthen collaboration between both prestigious institutions through academic exchange, joint research projects, innovative initiatives, and knowledge exchange, implementing National Education Policy 2020, multi-disciplinary student exchange, resource sharing, and joint projects.

  • शैक्षणिक देवाणघेवाण | Academic exchange programs
  • संयुक्त संशोधन प्रकल्प | Joint research projects
  • नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ज्ञान विनिमय | Innovative initiatives and knowledge exchange
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी | Implementation of National Education Policy 2020
  • मल्टी डिसिप्लिनरी स्टुडन्ट एक्सचेंज | Multi-disciplinary student exchange programs
  • रिसोर्स शेअरिंग आणि जॉईन प्रोजेक्ट | Resource sharing and joint projects
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून अधिक संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
This collaboration is expected to provide students and researchers with more opportunities through interdisciplinary education, research, and innovative projects.